skip to Main Content

आपण विचार करणार की नाही?

दै. महाराष्ट्र टाइम्स ( कोल्हापूर ) मधील माझा स्तंभलेख, दि .३० सप्टेंबर २०१७

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात झालेल्या विचारसंगराने, प्रबोधनाने, वैचारिक लेखनाने आधुनिक महाराष्ट्राचा पुरोगामी विचार घडला. मराठी जनसमूहांचे आधुनिकीकरण झाले. मराठी समाजातील विचारमंथनाची व वैचारिक साहित्याची गेल्या दीडशे-पावणे दोनशे वर्षांची अत्यंत सकस व परिवर्तनवादी परंपरा खंडित होते की काय, अशी साधार भीती आज निर्माण झाली आहे. सध्या ललित साहित्याशी तुलना करता वैचारिक लेखन तुलनेने फार कमी होत आहे. वैचारिक साहित्याची संख्यात्मक व गुणात्मक वाढ खुंटली आहे. वैचारिक लेखनाचा दर्जा काही अपवाद वगळता उत्तरोत्तर खालावत चालला आहे.

This Post Has 0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top