शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर ही माय मराठीच्या विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य उपक्रमशील संस्था आहे. “ सामर्थ्य माय मराठीचे / विकसन myबोलीचे” या ब्रीदवाक्याने संघाची स्थापना २००८ साली झाली. मराठी भाषा साहित्य, संस्कृती, संवर्धन, संशोधन आणि सर्जनशील लेखन यासंदर्भात ‘शिविम’ ने विद्यार्थी, शिक्षक व समाजकेन्द्री विविध उपक्रमाने ठसा उमटविला आहे. अकरा राष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशने युजीसी मान्यताप्राप्त विद्वत्प्रमाणीत ‘शिविम संशोधन पत्रिकेचे’ प्रकाशन , गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामाजिक बांधिलकी असे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत ; त्यासाठी अनेक दानशूर हात पुढे येत आहेत. सभासदांच्या योगदानाने ‘ शिविम ‘ विकासाभिमुख होत आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.